महाराष्ट्र

टीआरपी घोटाळा : अर्णव गोस्वामींना उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई : कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना चौकशीसाठी बोलवायचे झाल्यास आगाऊ तीन दिवसांची (सुट्यांचे दिवस वगळून) स्पष्ट नोटीस द्यावी. तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करायची झाल्यास आगाऊ ७२ तासांची स्पष्ट नोटीस द्यावी, जेणेकरून त्यांना योग्य न्यायालयासमोर दाद मागता येईल, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई पोलिसांना दिला. त्यामुळे गोस्वामींना दिलासा मिळाला आहे.

कथित टीआरपी घोटाळ्यात आम्हाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशा विनंतीच्या याचिका गोस्वामी आणि रिपब्लिक वृत्तवाहिन्यांची मालक कंपनी एआरजी आऊटलायर मीडियाने केल्या आहेत. त्याविषयी अनेक दिवस सुनावणी घेतल्यानंतर न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने बुधवारी हा अंतरिम आदेश दिला.

पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपपत्र दाखल करूनही त्यात गोस्वामी किंवा एआरजीच्या कर्मचाऱ्यांना आरोपी म्हणून दाखवलेलेच नाही. केवळ संशयित दाखवले आहे. अशाप्रकारे पोलिस सातत्याने कारवाईची टांगती तलवार ठेवत आहेत. गोस्वामी यांना यापूर्वी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट असूनही न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून परवानगी न घेताच अटकेची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणातही तशीच कुहेतूने कारवाई केली जाऊ शकते, असा युक्तिवाद याचिकादारांतर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी मांडला होता. तर ‘गोस्वामी स्वत:साठी विशेष दर्जा असल्याचा दावा करू शकत नाहीत. त्यांनाही चौकशीचा सामना करावा लागेल आणि आवश्यकता भासल्यास अटक करायची की नाही हे तपास अधिकारीच ठरवू शकतो, असे म्हणणे मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी मांडले होते. अखेरीस ‘याचिकादारांचे आरोपी म्हणून नावच नसताना त्यांच्या डोक्यावर अमर्यादित कालावधीसाठी टांगती तलवार ठेवली जाऊ शकते का?’, असे विविध प्रश्न खंडपीठाने उपस्थित केले. तसेच याचिकादारांविरोधातील तपास किती दिवसांत पूर्ण करणार? अशी विचारणाही केली होती. त्यानुसार, १२ आठवड्यांत तपास पूर्ण केला जाईल, असे ठाकरे यांनी बुधवारी पोलिसांतर्फे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर, ‘पोलिसांकडून कुहेतूने कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. केवळ ते लक्षात घेऊन आगाऊ नोटीसचा अंतरिम आदेश देत आहोत’, असे खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आणि याचिकांवरील पुढील सुनावणी २८ जूनला ठेवली.

न्यायालयाचे अन्य निर्देश

  1. टीआरपी घोटाळ्याचा तपास पोलिस सुरूच ठेवू शकतील.
  2. पोलिसांनी चौकशीसाठी समन बजावल्यास गोस्वामींनी हजर राहून तपासात सहकार्य करावे.
  3. आदेशाप्रमाणे ७२ तासांची आगाऊ नोटीस देण्याच्या प्रक्रियेचे पालन केल्याविना गोस्वामींना अटक करू नये.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago