कोरोना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होली व धूलिवंदनास मनाई; नियमांचे उलंघन केल्यास होणार कठोर कारवाई

पुणे : राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव झपाट्याने पसरण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचे नमूद करत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात होळी व धूलिवंदन साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे शहरासाठी पालिका आयुक्तांनी अशाच प्रकारचे आदेश काढले आहेत.

खबरदारीचे उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे २८ मार्च रोजी साजरा होणारा होळी उत्सव तसेच २९ मार्च रोजी साजरा होणारा धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीही अशाच प्रकारचा आदेश काढला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुणे पालिका हद्दीत होळी आणि धूलिवंदन सार्वजनिकरित्या वा वैयक्तिक स्वरूपात साजरे करण्यास मनाई असेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

5 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago