महाराष्ट्र

भिक्षेकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगरच्या धर्तीवर प्रकल्प उभारणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : भिक्षेकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगर येथे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित ‘वसुधा’ हा प्रकल्प सुरू आहे, या प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात अन्यत्र प्रकल्प उभारण्याबाबत कार्यवाही व्हावी यासाठी विभागाने पाहणी करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्रालयात महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भिक्षेकरी पुर्नवसन प्रकल्पाबाबत आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला आर्थिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, भिक्षेकरी समाज बांधवांना सन्मानाने जगता यावे, कष्टाची भाकरी मिळून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे विविध विभागांच्या सहकार्याने सुरू असलेला हा प्रकल्प, शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. राज्यात इतर ठिकाणी देखील भिक्षेकरी गृह आहेत. त्या भागाचाही विकास होण्याकरिता महिला व बालविकास विभागाने सर्वसमावेशक अभ्यास करावा आणि नव्याने काही भागांचा देखील यामध्ये समावेश करता येईल का याबाबत पाहणी करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago