महाराष्ट्र

महिला बचतगटांसाठी सुरु केलेल्या पथदर्शी प्रकल्पास गती द्यावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकसित करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता लोरियल इंडिया आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने सातारा, नाशिक आणि रायगड येथे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे काम गतीने करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्रालयात महिला आर्थिक विकास महामंडळ आणि लोरियल इंडिया यांच्या प्रतिनिधींसमवेत घेण्यात आलेल्या बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड, लोरियल इंडियाच्या संचालक कृष्णा विलासनी यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ‘माविम’ एक महिला बचत गटांचे उत्कृष्ट संघटन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य विकसित करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता लोरियल इंडिया आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने सातारा, नाशिक आणि रायगड येथे महिला बचतगट यांना ब्यूटीपार्लरचे प्रशिक्षण देण्यासाठी जागा निश्चित करून प्रशिक्षण देण्याचा कालावधी ठरवणे, बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम ठरवावा, असेही त्या म्हणाल्या.

सार्वजनिक ठिकाणी महिलांना काही वेळेस असुरक्षित वातावरणात प्रवास करावा लागतो हे टाळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतचा आराखडा तयार करावा आणि त्याबाबत महिला व बालविकास विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले. लोरियल इंडियाच्या संचालक कृष्णा विलासनी यांनी यावेळी लोरियलमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माहिती सादर केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago