महाराष्ट्र

दिल्लीतील शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीतील मराठी विद्यार्थ्याची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

सांगली : राजधानी दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांनी दिलेल्या मानसिक छळाला कंटाळून दहावीमध्ये शिकत असलेल्या एका मराठी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी असलेल्या मुलाने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून खाली रस्त्यावर उडी मारून आपले जीवन संपवले.

सोने–चांदी गलाई व्यवसायानिमित्त या मुलाचे वडील श्रीयुत पाटील हे अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये स्थायिक आहेत. त्यामुळे हा मुलगा कुटुंबीयांसह राजीव नगर परिसरात राहत होता. तो सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता.

मानसिक छळामुळे टोकाचा निर्णय
१८ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. शरदने दीड पानांची सुसाइड नोट लिहून शिक्षिकांनी सतत मानसिक छळ केल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले. “स्कूलवालों ने इतना बोला की मुझे यह करना पड़ा… मम्मी सॉरी… भैय्या सॉरी…” असे भावनिक शब्द त्याने लिहिले होते. तसेच, गरज पडल्यास आपले अवयव दान करावेत, अशीही त्याची अंतिम इच्छा त्यात नमूद होती.

चार शिक्षिकांविरुद्ध गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सुसाइड नोटच्या आधारावर शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल तसेच शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

गावात शोककळा; आज अंत्यसंस्कार
घटनेच्या वेळी शरदचे वडील ढवळेश्वर येथे कामानिमित्त आले होते. घटनेची माहिती मिळताच ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. मृत मुलाचे पार्थिव मूळगावी आणण्यात आले असून आज त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. या सर्व प्रकारामुळे ढवळेश्वर गावासह सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

13 तास ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 दिवस ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 महिने ago