महाराष्ट्र

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा, ‘या’ जिल्हांना येलो अलर्ट जारी

पुणे : वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. येत्या 5 दिवसांत तीव्र हवामानाचा इशारा अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. 7 मार्चपासून महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

कोकणात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्, विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. 7 मार्च रोजी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्हांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतरचे काही दिवस आणखीही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 मार्चनंतर पुणे, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

7 ते 9 मार्चदरम्यान महाराष्ट्र, गुजरात, पू.राजस्थान व प. मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago