Mla Vinayak Mete Death In Road Accident At Pune Expressway
मुंबई : माजी आमदार विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. ते ५२ वर्षांचे होते. आज मुख्यमंत्र्यांनी मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती, त्याच बैठकीला हजेरी लावण्याकरिता मेटे बीडहून मुंबईकडे येत होते. बीडमध्ये आज मोठा कार्यक्रम असतानाही समाजाच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली उपस्थिती महत्त्वाची आहे, हे प्रमाण मानून त्यांनी बीडमधला कार्यक्रम सोडला आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले. परंतु, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रायगडच्या हद्दीत त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर सुमारे तासभर त्यांना मदतच मिळाली नाही, असा गंभीर आरोप त्यांच्या वाहनाच्या चालकाने केला आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे उपचार सुरू असतानाच मेटे यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…