महाराष्ट्र

भीषण अपघात! अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

जळगाव : ट्रीपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिनही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या फुलगाव फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळ आज (२५ मे) दुपारी घडली. या अपघातात विवेक सुनील पाटील (वय १७), देवानंद सोपान पाटील (वय १६) आणि तुषार राजेंद्र पाटील (वय १७) या तिन्ही अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे.

भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील रहिवासी असलेले विवेक, देवानंद आणि तुषार हे तिघे मित्र आज सकाळी कामानिमित्त भुसावळ येथे आले होते. काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने घरी परतत असताना फुलगाव फाट्याजवळ असलेल्या उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या जोरदार धडकेमुळे हे तिघे दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले. यात तिघांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. विवेकचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर देवानंद आणि तुषार या दोघांना तात्काळ गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतु, या दोघांचा देखील रुग्णालयात उपचार सुरु करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तळवेल गावावर शोककळा पसरली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago