मनोरंजन

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला

पुणे : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे वडिल मनोहर कुलकर्णी (63 वर्ष) यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निगडी येथील त्यांच्या राहत्या घरात ही घटना घडली आहे. हा हल्लेखोर सोनालीचा चाहता असल्याचे सांगत होता. त्याने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे घर आहे. आरोपी अजय शेगटे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांच्या दाराजवळ आला. त्यावेळी सोनालीचे आई-वडील घरात होते. मनोहर कुलकर्णी यांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला असता माथेफिरु अजयने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात ते किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी कुलकर्णी यांनी निगडी पोलिसांत चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

कुलकर्णी यांच्या इमारतीतील रहिवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला पकडले. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी आरोपीने आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन असल्याचे सांगितले. तपासादरम्यान आरोपीकडे खोटे पिस्तूल आणि चाकू पोलिसांना आढळले आहे. निगडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago