महाराष्ट्र

झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, हेडफोनच्या वापरामुळे घडला अनर्थ…

सांगली : सांगलीत हेडफोनच्या वापरामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. फांदी तुटण्याचा आवाज न आल्याने तरुण फांदीच्या खालीच बसून राहिला आणि झाडाची फांदी अंगावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. 23 वर्षीय मुलाच्या अकाली मृत्यूने त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. यश उर्फ ​​हर्षवर्धन बाळासाहेब कदम असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हर्षवर्धन कदम हा मिरज मेडिकल कॉलेजच्या मैदानावर दररोज पोलीस भरतीच्या सरावासाठी यायचा. व्यायामानंतर तो कॅम्पसच्या कंपाउंडच्या भिंतीवर बसला होता आणि त्याच्या कानात हेडफोन होते. हर्षवर्धन जिथे बसला होता, त्याच्यामागे एक मोठे वडाचे झाड होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड जोरात हलत होते. मात्र, हर्षवर्धनच्या कानात हेडफोन असल्यामुळे त्याला कोणताच आवाज आला नाही. जोरदार वाऱ्याने झाडाची फांदी तुटून हर्षवर्धनच्या अंगावर येऊन पडली. हर्षवर्धनचे डोके फांदीखाली आले. झाडाची फांदी खूप मोठी असल्याने जबर मार बसला आणि हर्षवर्धनचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, याबाबत पोलीस व अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने हर्षवर्धनचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. हर्षवर्धनचे वडील सलून व्यावसायिक आहेत. त्यांना आपला मुलगा पोलिसात भरती होईल, अशी आशा होती. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. या दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago