महाराष्ट्र

महिला घरेलू कामगारांच्या प्रश्नावर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : महिला घरेलू कामगारांची नोंदणी करणे, वेतन विषयक विविध प्रश्न, जनश्री विमा योजना लागू करणे या विविध प्रश्नांसाठी कामगार विभाग यांच्या समन्वयातून महिला घरेलू कामगारांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार समन्वय समितीची बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयानुसार मंडळाच्या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना करणे, किमान वेतन, घरेलू महिला कामगारांना जनश्री विमा योजना लागू करणे, ५५ वर्षांवरील महिला घरेलू कामगारांचे वेतनविषयक इतर प्रश्नांबाबत कामगार विभागाशी चर्चा करून याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल.

यावेळी राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळ, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, कामगार एकता युनियन, विदर्भ मोलकरीण संघटना, महाराष्ट्र महिला परिषद, महामाया समाज विकास ट्रस्ट, जनकल्याण सोशल फाऊंडेशन, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटन, सीएफटीयूआय, महाराष्ट्र घरकामगार विकास संघटन, घर हक्क संघर्ष समिती, कष्टकरी घरकामगार संघटना, निर्माण मजदूर, श्रमजिवी संघटना, विश्वशांती महिला विकास मंडळ, आनंद आधार घरेलु कामगार संघटना, श्रमिक किमयागार संघटना, महाराष्ट्र फेरीवाला महासंघ, महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना, घर कामगार मोलकरीण संगठना, कष्टकरी संघर्ष महासंग, सर्व श्रमिक संघटना, ओएचएससी, मोलकरीण घरेलू कामगार संघ, गृहकार्य सेवा श्रमिक संघटना, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार संघटना, महाराष्ट्र कष्टकरी घरकामगार संघटना, मोलकरीण पंचायत, श्रमजीवी संघटना, घरकुल संघर्ष समिती, एआटीयूसी, सुराज्य श्रमिक सेना, भाकर फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago