Government of Maharashtra
मुंबई : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे दुचाकी वाहनांसाठी असलेली एमएच०३इएच (MH03EH) ही मालिका संपत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांसाठी एमएच०३इजे (MH03EJ) नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे.
ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या नवीन क्रमाकांच्या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल, त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, पॅनकार्ड आणि पसंतीच्या क्रमांकासाठीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) (REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI (EAST)) किंवा RTO MUMBAI (EAST) यांच्या नावे काढलेल्या विहीत शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह 9 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) कार्यालयात सादर करावा.
एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास राज्य शासनाच्या 8 मे 2016 च्या अधिसुचनेनुसार नियमित शुल्का व्यतिरिक्त सर्वात जास्त रकमेच्या धनाकर्ष सादर करणाऱ्यास सदर नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहे. आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठीची कार्यपद्धती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. अनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वाहन धारकांनी स्वत: कार्यालयात अर्ज करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…