महाराष्ट्र

राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने बघण्याची गरज

दूध व्यवसाय करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. यात शेतकऱ्यांना खूप खर्च देखील करावा लागतो. पशूंचा चारा, त्यांचे लसीकरण, त्यांच्या आरोग्यविषयक गरजा, त्यांना लागणारी पेंड या सगळ्याचे व्यवस्थापन केल्यानंतर दुधाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्याने शेती उत्पादनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जनावरे सांभाळून कुटुंबाची उपजीविका करणारे शेतकरी आता अडचणीत आले आहेत. कारण गेल्या चार-पाच महिन्यांपासून दुधाला दर मिळत नाही. कोरोनाची संचारबंदी उठल्यानंतर तरी शेतीमाल व दुधाला दरवाढ मिळेल या अपेक्षेवर शेतकरी बसले आहेत. सध्या दुधाला प्रती लिटर १५-16 रुपये दर मिळतो, तो वाढवून 27 रुपये प्रती लिटरपर्यंत करावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने बघण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळायला हवा. सरकारकडून आतातरी शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा आहे.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago