महाराष्ट्र

हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर.. – पंकजा मुंढे

सावरगाव (ता.पाटोदा) येथे दसरा मेळावा घेऊन गर्दी जमवल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राज्यसभा सदस्य भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकरांसह पन्नास जणांविरुद्ध अंमळनेर (ता.पाटोदा) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर…अशी प्रतिक्रिया भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

“अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पाहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे.

बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे रविवारी दसरा मेळावा झाला. हा दसरा मेळावा करोना महामारीमुळे ऑनलाइन झाला. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले होते. रविवारी रात्री उशिरा जिल्हा विशेष शाखेचे कर्मचारी किसन सानप यांच्या तक्रारीवरुन माजी मंत्री पंकजा मुंडे, राज्यसभा सदस्य भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, आ.मोनिका राजळे, माजी आमदार भीमराव धोंडे, सविता गोल्हार, पाटोदा पंचायत समिती सभापती सुवर्णा लांबरुड, सरपंच राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे व इतर पन्नास जणांविरुध्द कलम १८८, २६९, २७० आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago