महाराष्ट्र

पुण्यात इंजिनिअर पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचलं पतीला नपुंसक बनवण्याचं कारस्थान..

पुणे : पुण्यातील ही घटना अगदी एखाद्या चित्रपटात शोभेल अशी असून, पतीने पत्नीवर नपुंसक बनवण्याचं कारस्थान रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. पत्नीवर आरोप करणारा पती पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर पत्नी मेकेनिकल इंजिनिअर आहे. वारजे माळेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी पतीने पत्नीविरोधात तक्रार नोंदवली आहे.

लॉकडाऊनच्या काळात लग्न झालेले पती-पत्नी हनीमूनसाठी अनलॉकचा फेज सुरु झाल्यानंतर मागच्या आठवडयात हनीमूनसाठी महाबळेश्वरला गेले. तिथे ज्या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता त्याच हॉटेलमध्ये पत्नीचा प्रियकर सुद्धा आला होता. तिथे त्याने महिलेच्या पतीसोबत मैत्री केली. चांगली ओळख झाल्यानंतर महिलेचा प्रियकर तिच्या पतीला म्हणाला की, मी वारजेमध्ये राहतो. लॉकडाऊनमुळे माझी नोकरी गेलीय. त्यामुळे मला घरभाडे आता परवडत नाहीय. मी तुमच्या घरी येऊन राहू शकतो का? महिलेच्या पतीने त्याचा प्रस्ताव मान्य केला व त्याला आपल्या घरी राहण्यास परवानगी दिली.

एक दिवस महिलेच्या पतीने ट्रीपचे फोटो बघण्यासाठी त्याच्याकडे मोबाइल मागितला. मोबाइलवर फोटो पाहताना, त्याला पत्नीच्या घराचे फोटो दिसले. त्यावेळी महिलेच्या पतीच्या मनात संशय निर्माण झाला. एक रात्री पत्नीचा प्रियकर गाढ झोपल्यानंतर महिलेच्या पतीने त्याचा मोबाइल तपासला, त्यावेळी त्याला आपल्या पत्नीचे सदर व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरु असून दोघांनी मिळून त्याला नपुंसक बनवण्याचा कट रचल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पती अहमदनगरला त्याच्या घरी निघून गेला व आई-वडिलांना या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर वारजे येथील पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी व तिच्या प्रियकराविरोधात तक्रार नोंदवली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago