महाराष्ट्र

मराठी पत्रकारितेत बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू दिले आहे. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वसा आणि वारसा जतनाचे सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चितच आहे, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन केले आहे. तसेच मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या विद्वत्तेच्या बळावर परकीय राजवटीत मराठी पत्रकारितेचा पाया घातला. आपल्या लेखनातून ब्रिटिशांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा बाणेदारपणा दाखवला. आज पर्यावरणीय बदल आणि मानव, जीवमात्रांचे आरोग्य, त्यांचे अस्तित्व अशी आव्हाने उभी राहू लागली आहेत. या नव्या संदर्भाने माध्यमांची भूमिका, पत्रकारिता याबाबत चर्चा सुरू झाली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. पण पत्रकारितेच्या मूल्यांना कुणीही धक्का लावू शकत नाही, असा धडाच आचार्य बाळशास्त्री यांनी आपल्या कर्तृत्वातून घालून दिला आहे. हा वसा आणि वारसा जतनाचे सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चितच आहे. हा बाणेदारपणा जागवणे हेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन आहे. त्यासाठी पत्रकार बंधू-भगिनींना मराठी पत्रकार दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago