महाराष्ट्र

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ वाढले, मृतदेहाच्या तोंडात पाच रुमाल कोंबलेले आढळले

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराच्या अँटिलीयाच्या बाहेर संशयास्पद स्कॉर्पिओ कार सापडली होती. ती कार मनसुख हिरेन यांची असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. मात्र, आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. वास्तविक, हिरेन यांच्या मृतदेहाच्या तपासणी दरम्यान त्यांच्या तोंडातून पाच हातरुमाल बाहेर आले आहेत. तसेच त्यांचा मृतदेह नाल्यातून सापडला आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं आता बोललं जात आहे.

प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा होता. परंतु मनसुख हिरेन यांच्या तोंडात पाच रुमाल कोंबलेले आढळले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. शुक्रवारी मनसुख यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत नाल्यातून सापडला. त्यांचा मृतदेह खाडीतून बाहेर काढला, तेव्हा तो चिखलात बरबटलेला होता. त्यांचा शर्ट फाटलेला होता. मृतदेह तपासला असता त्यांच्या तोंडात 5 रुमाल आढळले. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं आता बोललं जात आहे.

मनसुख यांची पत्नी विमला हिरेन यांनी आत्महत्येचा अँगल पूर्णपणे नाकारला आहे. त्यांनी सांगितलं कि, मनसुख एक हसतमुख व्यक्ती होते आणि ते आत्महत्येचा विचारही करू शकत नव्हते. त्यांनी आत्महत्या केली ही अफवा आहे आणि त्याचा तपास झाला पाहिजे. त्या पुढे म्हणाल्या की, गुरुवारी मनसुख यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते, परंतु त्यानंतर ते घरी परतलेच नाही. कांदिवली येथून त्यांना तावडे नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. या अधिकाऱ्याला भेटण्याबाबत मनसुख यांनी सांगितले होते.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले की अंबानी यांच्या घराच्या अँटिल्याच्या बाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचे नाव सॅम आहे. त्याने कार देखभाल दुरुस्तीसाठी मनसुख हिरेन यांना दिली. परंतु, सॅमने पैसे दिले नाहीत तेव्हा मनसुख यांनी कार स्वत: कडे ठेवली. मनसुख यांनी पोलिसांना सांगितले होते की, 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ते ठाण्याहून घरी जात होते, तेव्हा गाडी वाटेतच थांबली. मनसुख घाईत असल्यामुळे त्यांनी कार ऐरोली पुलाजवळ रस्त्याच्या कडेला पार्क केली. दुसर्‍या दिवशी ते गाडी घेण्यासाठी गेले असता गाडी तिथे सापडली नाही. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago