महाराष्ट्र

अंधश्रद्धेचा कहर! तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके

अमरावती : भोंदूबाबाने तीन वर्षांच्या चिमुकल्याला उपचाराच्या नावाखाली विळ्याचे चटके दिल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात घडला आहे. या मुलाला ताप आल्यानंतर डॉक्टरांकडे नेण्याऐवजी भोंदूबाबाकडे नेऊन अघोरी उपचार करण्यात आले. या प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मेळघाटातील खटकाली गावात तीन वर्षाच्या चिमुकल्याला ताप आला त्यामुळे त्याला त्याच्या आई-वडिलांनी धामणगाव गडी इथल्या आरोग्य उपकेंद्रामध्ये दाखल केलं होतं. मात्र, तिथे त्याचा ताप उतरत नसल्याने आई-वडिलांनी त्याला भोंदूबाबाकडे नेलं. यात अंधश्रद्धेतून भोंदूबाबाने उपचाराच्या नावाखाली या मुलाच्या पोटावर गरम विळ्याने चटके दिले. या भयंकर प्रकारानंतर मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलाच्या पोटावर चटके दिल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाली, त्यामुळे त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे आवश्यक ते उपचार करुन बालकाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी मुलाच्या आई-वडिलांचा जबाब घेऊन पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती चिखलदरा पोलीस स्थानकातील पोलिसांनी दिली आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago