Maharashtra Minister Eknath Shinde
मुंबई : भटक्या व विमुक्त समाजाच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भटक्या- विमुक्त समाजाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक विधानभवन येथे झाली. बैठकीला इतर मागास व बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भटके- विमुक्त समाजाच्या प्रतिनिधींमार्फत विविध प्रश्न मांडण्यात आले. यात शैक्षणिक प्रश्न, घरांची उपलब्धता यासह भटके- विमुक्त समाजातील लोककलावंतांच्या अडचणींची माहिती देण्यात आली. महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या लोककला जोपासणाऱ्या लोककलावंताना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या मानधन ५ हजार करण्याची मागणी करण्यात आली.
या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, तसेच लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी समाजाच्या प्रतिनिधींना दिले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…