Revenue is an important department of the government - Vidhan Sabha Speaker Adv. Rahul Narvekar
मुंबई : महसूल विभागासोबत समाजातील प्रत्येक नागरिकांचा संबंध येतो. त्यांच्या सेवेसाठी विभाग सदैव तत्पर असून हा विभाग प्रशासनाचा कणा असल्याचे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी काढले.
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होणे आवश्यक आहे. नागरिकांना या योजनांचा योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल विश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उद्देशाने 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.
नार्वेकर म्हणाले की, कोणत्याही आपत्तीच्या वेळी प्रथम महसूल विभागाकडे जबाबदारी दिली जाते. निवडणुकीची जबाबदारी देखील महसूल विभागामार्फत यशस्वीपणे पार पाडली जाते. एकूणच राज्यातील नागरिकांच्या भविष्य, भवितव्य आणि कल्याणाची मोठी जबाबदारी हा विभाग सांभाळत असून ती चोखपणे पार पाडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महसूल विभागाने दाखले तत्काळ देण्याचा प्रयत्न करावा – पालकमंत्री दीपक केसरकर
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन नागरिकांपर्यंत पोहोचून विविध योजनांचा लाभ मिळवून देत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी मागणी केलेले दाखले विभागाने लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले.
मंत्री केसरकर म्हणाले की, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. येथे नागरिकांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच कोळीवाड्यांच्या सर्वांगीण विकासाद्वारे शहराच्या मूळ परंपरेची ओळख पर्यटकांच्या माध्यमातून जगभर करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महिलांसाठी सर्वसमावेशक सुविधा केंद्र, धार्मिक स्थळांचा परिसर विकास, घरांना छप्पर, म्हाडाच्या घरांना लिफ्ट, कामगार केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधा आदींबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असून तेथेच शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी प्रास्ताविकाद्वारे नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रत्येक कामामध्ये महसूल विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. इंग्रजांच्या काळापासूनची महसूल जमा करणारी ही महत्त्वाची यंत्रणा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली.
महसूल सप्ताहांतर्गत विभागातर्फे दि. 1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जनसामान्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…