The Car Stuck Into A Tree While Crashing Into A 400 Feet Deep Ravine
सातारा : वाईहून पाचगणीला जाणाऱ्या कारला पसरणी घाटात अपघात झाला. परंतु, यावेळी मोठा अनर्थ टळला. घाटातील वळण चालकाच्या लक्षात न आल्यामुळे कार रस्त्याच्या संरक्षक कठड्यावरुन खाली गेली. परंतु, काही फूट अंतरावर गेल्यानंतर कार एका झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. नाहीतर ही कार तीन-चारशे फूट खोल दरीत कोसळली असती. या कारसह सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलीन ठक्कर व त्यांचे कुटुंबीय काही कामानिमित्त वाईला गेले होते. तेथून पसरणी घाटातून पाचगणीला जात असताना मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे वळणाचा अंदाज न आल्यामुळे त्यांची कार संरक्षक कठड्यावर चढून दरीच्या बाजूला गेली. मात्र ही कार काही फूट अंतरावर असणाऱ्या झाडात अडकल्यामुळे मोठा अपघात टळला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी तात्काळ पसरणी घाटात धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या साह्याने कार बाहेर काढण्यात आली. त्यामुळे कारमधील एक पुरुष व दोन महिलांचे प्राण वाचले. वाई पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…