corona
शांघाई : कोरोनाच्या उगमाबाबत सुरु असलेल्या चौकशीच्या पुढच्या टप्प्यात अमेरिकेची चौकशी करण्याची मागणी चिनी शास्त्रज्ञांनी केली आहे. चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे मुख्य एपिडिमोलोजिस्ट झेंग गुआंग यांनी म्हटले आहे की आता अमेरिकेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. डिसेंबर २०१९ च्या अखेरीस चीनमधील वुहानमध्ये कोरोनाबाधित आढळले होते. परंतु, एका अहवालानुसार, अमेरिकेत डिसेंबर २०१९ च्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच कोरोनाचा संसर्ग फैलावत होता.
युएस नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थने या आठवड्यात प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, कोरोनाच्या पहिल्या बाधिताची माहिती समोर येण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच अमेरिकेतील पाच वेगवेगळ्या राज्यांमध्ये किमान सात जणांना कोरोनाची लागण झाली होती. चीनने याच अहवालाच्या आधारे आता अमेरिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
झेंग गुआंग यांनी ‘ग्लोबल टाइम्स’ला सांगितले की, कोरोना विषाणूच्या उत्पतीबाबत सुरू असलेल्या चौकशीचा रोख आता अमेरिकेकडे नेण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेतील जैविक प्रयोगशाळांशी निगडीत असलेल्या सर्व बाबींची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. तसेच जैव-शस्त्रांसंबंधित विषयांची छाननी केली जावी.
मागील वर्षी कोरोनाच्या संसर्गाचा जगभरात फैलाव झाल्यानंतर तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर निशाणा साधत त्यांच्याविरोधात मोहीम सुरू केली होती. कोरोनाच्या विषाणूची उत्पत्ती चीनमध्येच झाली असल्याचा दावा सातत्याने अमेरिकेकडून करण्यात येत आहे. याआधी एका संशोधनात SARS-CoV-2 चा विषाणू सप्टेंबर महिन्यात युरोपमध्ये फैलावला असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, तेव्हादेखील तज्ज्ञांनी असं मत मांडलं होतं की याचा अर्थ असा होत नाही की विषाणूचा उगम चीनमध्ये झाला नाही, कारण चीनच्या जंगलात सार्ससारखे अनेक कोरोना विषाणू आढळतात.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…