Modak Maharaj passed away in a terrible accident
ठाणे : नवनीत्यानंद (मोडक महाराज) यांचे पुणे बंगळूरू महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात निधन झाले. कारच्या समोरील काच फुटून मोडक महाराज हे बाहेर फेकले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. श्री. नवनित्यानंद मोडक महाराज उर्फ अरुण सिताराम मोडक (वय ५४) रा. कल्याण पश्चिम येथील सदगुरु श्री. स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष होते.
पुणे बंगळूरू महामार्गावर साताऱ्यातील सातारा शहरातील अजिंठा चौक परिसरात कार दुभाजकावर आदळून हा अपघात झाला. कल्याण येथील स्वामी समर्थ मठातील अरुण मोडक हे कारने कल्याणहून कोल्हापूरकडे जात होते. यावेळी गणेश जगदीश नरडूक हे गाडी चालवत होते. पहाटेच्या सुमारास ते अजंठा चौक परिसरात आले. यावेळी चालकाला डुलकी आल्याने कार महामार्गाच्या दुभाजकावर जाऊन आदळली. यावेळी शेजारी बसलेले अरुण मोडक हे समोरच्या काचेतून बाहेर फेकले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कल्याण जिल्ह्यात मोडक महाराज यांनी श्री. स्वामी समर्थ मठांची स्थापना केली होती. त्यांचे राज्यभरात अनुयायी सुद्धा आहेत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…