अमरावती

उमेश कोल्हे हत्या प्रकरणात NIA कडून मोठा खुलासा, मारेकरी तबलिगी जमातशी संबंधित

अमरावती : अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. NIA ने खुलासा केला आहे की, ‘उमेश कोल्हे यांची हत्या करणारा व्यक्ती तबलीगी जमातीचा होता’. सामाजिक कार्यकर्ते इरफान खान आणि मौलवी मुशफिक अहमद त्याला भडकावायचे.

एनआयएने असेही सांगितले की, ‘कोल्हे अमरावतीमध्ये त्यांचे मेडिकल स्टोअर चालवत होते. 21 जूनच्या संध्याकाळी तिघांनी मिळून त्यांची हत्या केली. कोल्हे घरी परतत असताना वाटेत आरोपींनी त्यांना घेरून त्यांची हत्या केली. या हत्याकांडापासूनच खुन्याचा दहशतवादाशी आणि कट्टरतावादाशी संबंध असल्याची भीती व्यक्त होत होती.’

एनआयएचे म्हणणे आहे की आरोपी आधीच कोल्हे यांचा पाठलाग करत होते आणि संधीच्या शोधात होते. कोल्हे यांची सून आणि मुलगा हत्येच्या रात्री दुसऱ्या दुचाकीवर होते. त्यांनी कोल्हे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. गेल्या शुक्रवारी एनआयएने 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्याच वेळी, एजन्सीने दावा केला आहे की उमेश कोल्हे यांची हत्या तबलिगी जमातच्या कट्टरपंथी इस्लामीने केली आहे. यासोबत एनआयएने सांगितले की, या दहशतवादी गटावर ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’ सारख्या गोष्टींचा प्रभाव होता. कोल्हे यांच्या हत्येनंतर आठवडाभरातच उदयपूरमध्ये शिंपी कन्हैयालालची हत्या झाली. आरोपींनी कन्हैयाचा शिरच्छेद केला होता. नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर या घटना घडल्या.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago