ठाणे

ठाण्यात घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना, ३ मुलांसह 5 जणांचा मृत्यू

ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व इथे डोंगर परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात घरांवर दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचाव आणि शोधकार्य सुरू आहे.

या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून यात तीन लहान मुलांचा समावेश आहे. यात रविकिशन (12 वर्षे), सिमरन (10 वर्षे) आणि संध्या (३ वर्षे) यांचा समावेश आहे. प्रभू यादव (वय 45) आणि विद्यावती (वय 40) यांचाही मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. 5 वर्षांची प्रीती आणि 18 वर्षीय अचल यांना वाचवण्यात यश मिळाले आहे.

दरम्यान, मागील तीन दिवसांपासून ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाण्यानजीक असणारा मासूंदा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago