ठाणे

ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात 79 पदे निर्माण करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. वाढते नागरीकरण, नैसर्गिक आपत्ती यामुळे एनडीआरएफच्या धर्तीवर सदर आपत्ती प्रतिसाद दल कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेस ही मान्यता दिली.

ठाणे महानगरपालिकेने या संदर्भात आपत्ती प्रतिसाद पथकात वर्ग-२ व वर्ग-३ मध्ये ७९ पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला होता. ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शासनाने ८८० पदे निर्माण करण्यास मंजुरी दिली होती. त्यामध्ये मुख्यतः आरोग्य विभागातील पदे होती, मात्र आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद पथकातील पदांचा समावेश नव्हता. आता आपत्ती प्रतिसाद पथकामध्ये वर्ग दोनचे एक पद कमांडंट तसेच वर्ग तीनची डेप्युटी कमांडंटची तीन पदे आणि प्रतिसादकांची (रिस्पॉडंर) ७५ पदे अशी ७९ पदे निर्माण केली जातील. यासाठी महानगरपालिकेस ४.६४ कोटी खर्च येईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago