मुंबई

राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग कल्याण ध्वजनिधी संकलन मोहिमेचा शुभारंभ

मुंबई : ‘नॅब’ ही संस्था दृष्टिबाधित, बहुविकलांग व्यक्तींना रोजगार प्रशिक्षण देण्याचे तसेच दिव्यांग मुलामुलींना शिक्षण उपलब्ध करून देण्याचे पुण्यकार्य करीत आहे. ‘नॅब’ संस्थेच्या समस्यांबाबत आपण शासनस्तरावर बैठकीचे आयोजन करून समस्यांचे निराकरण करू, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले. ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ (नॅब ) संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्यावतीने आयोजित दिव्यांग कल्याण ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा आरंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.7) राजभवन येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

‘नॅब’ संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या विद्यार्थिनी वसतिगृहातील दृष्टिबाधित विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी शासनाकडून मिळत असलेले योगदान संस्थेतील सर्व मुलींना मिळावे तसेच संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या बी. एड. अभ्यासक्रमाला पुनश्च विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता मिळावी, अशी अपेक्षा नॅब महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला नॅब महाराष्ट्रचे मानद सचिव गोपी मयूर, कोषाध्यक्ष विनोद जाजू, दिव्यांग उद्योजक भावेश भाटिया, नॅबचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मंगला कलंत्री आदी उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago