ठाणे

ठाण्यात अग्नितांडव : SKI कंपनीला भीषण आग, 500 हून अधिक कामगारांना वाचवण्यात यश

ठाणे : ठाण्यात शाहपूर तालुक्यातील आसनगाव फाट्याजवळील SKI कंपनीला भीषण आग लागली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागली असून ६ तासांनंतरही आग विझवण्यात यश मिळालेलं नाही. बिरौली गेटजवळील या कारखान्यात प्लॅस्टिकचे सामान बनविण्यात येते. आग इतकी भीषण आहे की घटनास्थळी आग विझविण्यासाठी २० पेक्षा जास्त अग्निशमन गाड्या पोहोचल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत.

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, कंपनीचे एकूण सात विभाग आहेत, त्यापैकी पाच विभाग पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी आले आहेत. दरम्यान, आगीची माहिती मिळताच सर्व कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आगीत प्लास्टिक जळाल्यामुळे निघणारा काळा धूर आजूबाजूच्या परिसरात पसरला आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार ती लेव्हल -3 ची आग आहे. आग विझविण्यासाठी कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, आणि ठाणे येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागविण्यात आल्या आहेत.

या कारखान्यात रोजच्या वापरातील प्लास्टिक बॉक्स, बादल्या, टिफिन बॉक्स आणि घरगुती वस्तू तयार करण्यात येतात. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या कारखान्यात दिवस-रात्र शिफ्टमध्ये सतत काम सुरु असते. एका शिफ्टमध्ये 500 हून अधिक मजूर काम करत होते. सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago