स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अटक

पुणे : स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्ता गाडे याला अखेर अटक करण्यात आली आहे. त्याच्याच गावात असलेल्या एका शेतातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर गाडे त्याच्या गुणाट या गावी आला होता. महाशिवरात्री असल्याने तो तिथल्या कीर्तन कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता. मात्र माध्यमांवर त्याचा फोटो आल्यानंतर तो तिथून फरार झाला. गावकऱ्यांनी त्याला गावात आल्याचे पाहिले होते. त्यानुसार पोलिसांची 13 पथकं त्याचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आली होती. गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरु होता. तसेच श्वान पथक, ड्रोनच्या माध्यमातून देखील त्याचा शोध सुरु होता. पोलिसांनी काल दिवसभर शोधाशोध करून देखील तो सापडला नव्हता. मात्र, मध्यरात्री दीडच्या सुमारास तो पोलिसांना सापडला.

स्वारगेट पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला पुण्यात आणण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाती लागला. आरोपीला आज दुपारी तीननंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपीला सध्या लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पुणे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी काल दिवसभर शोधाशोध केली. सुरुवातीला सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीची ओळख पटली होती. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात येत होता. आरोपी हा त्याच्या शिरुर येथील गुणाट गावीच गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पुणे गुन्हे शाखेचे आठ पथक काल सकाळी गुणाट गावी दाखल झाले. त्यांच्याकडून युद्ध पातळीवर तपास सुरु होता. या दरम्यान आरोपी हा गुणाट गावच्या ऊसाच्या शिवारात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शेतामध्ये असणाऱ्या एका घरी तो पाणी प्यायला गेला होता, अशी देखील माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे आरोपी इथेच लपून बसल्याची खात्री पोलिसांना झाली.

पोलिस उसाच्या शेतात शिरुन त्याचा शोध घेत होते. आरोपीच्या शोधासाठी अत्याधुनिक ड्रोन, तसेच डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात आली. तसेच स्थानिक नागरिकही पोलिसांना मदत करत होते. मात्र, ऊसाचे शेत अतिशय दाट असल्याने आणि या परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे पोलिसांपुढे दुहेरी आव्हान होतं. बिबट्याचा वावर असल्यामुळे पोलिसांना अंधार पडल्यानंतर नाईलाजास्तव शोध मोहीम थांबवावी लागली. तरीही ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात होती. या दरम्यान रात्री दीड वाजेच्या सुमारास ऊसाच्या जवळच्या चारीत आरोपी झोपलेला आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. तिथल्या स्थानिकांनी हाच दत्ता गाडे असल्याचं सांगितलं. यावेळी गाडेकडे रोगर औषधाची बॉटल देखील मिळाली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. ३ वाजेच्या दरम्यान त्याला पुण्यात आणले गेले. ससूनमध्ये आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्याचीही माहिती मिळाली आहे.

दरम्यान, स्वारगेट सारख्या वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तरुणीने योग्य वेळी तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. त्यामुळे दत्ता गाडे सारख्या सराईत आरोपीला पकडणे शक्य झाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago