Police Commissioner Amitesh Kumar
पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या आरोपीला शिरूरमधील गुणाट गावात स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ड्रोन आणि डॉग स्कॉड यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत संपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात तपास विविध पथकांकडून सुरू होता आणि आरोपीला पकडण्यासाठी 500 पोलिसांचे शोध पथक तयार करण्यात आले होते. आरोपीला अटक करण्यात उशीर झाला आहे. त्याची ओळख दोन ते अडीच तासात पटली होती, पण त्यानंतरही तो आढळला नाही. अखेर, स्थानिकांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात यश आले, असेदेखील त्यांनी सांगितले.
आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी सर्व शक्ती वापरली, ज्यामध्ये स्वारगेट, झोन-२ व इतर विभागांच्या पथकांचा समावेश होता. पोलिस आयुक्त म्हणाले की, आरोपीच्या शोधासाठी 23 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि त्यानंतर आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात आला. स्थानिकांच्या सहकार्यामुळेच आम्ही आरोपीला पकडू शकलो. गुणाट गावातील स्थानिकांनी आमच्याशी उत्तम सहकार्य केले. त्यांचे आम्ही आभारी आहोत, आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही लवकरच त्या गावाला भेट देऊ, असं पोलिस आयुक्तांनी सांगितले.
आरोपीवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार पुणे पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल आणि विशेष वकिलांची नियुक्ती केली जाईल. पोलिस आयुक्तां सांगितले की, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि त्या संदर्भातील सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. तसेच, आरोपी दत्तात्रय गाडेच्या मानेवर दोरखंडाचे व्रण आढळले आहेत, ज्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला का, हे तपासले जाणार आहे.
एक लाख रुपयांचे बक्षीस
गावातील ज्या व्यक्तीने दत्ता गाडेची माहिती दिली, त्या व्यक्तीला एक लाखांचे बक्षीस दिले जाईल. त्याव्यतिरिक्त गावासाठी आम्ही काय करू शकतो ते देखील आम्ही करू असंही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. या घटनेत स्थानिक नागरिकांच्या महत्त्वपूर्ण सहभागामुळेच आरोपीला पकडण्यात यश आले. पुणे पोलिसांकडून नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत, आणि त्यांच्या सहकार्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत झाली आहे.
महिला सुरक्षेसाठी उपाययोजना
याप्रकरणानंतर पुणे पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना जाहीर केल्या आहेत. पोलिस आयुक्तांनी सांगितले की, महिलांच्या सुरक्षेविषयी एक आढावा घेतला. निर्जनस्थळी, एसटी स्टँड , रेल्वे स्थानक, डार्क स्पॉट, टेकडी स्पॉट, हॉटस्पॉटचे सेफ्टी ऑडिट सुरू आहे. महापालिका आणि इतर विभागाशी समन्वय साधून डार्क स्पॉट्समध्ये लाइट्स लावण्यात येतील, तसेच मार्शलकडून निर्जन स्थळांवर क्यूआर कोड मॅपिंग आणि सेफ्टी ऑडिट्स सुरू केले जाणार आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी महिला सुरक्षेविषयी दिली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…