महाराष्ट्र

भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

नागपूर : भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या घटनेची दखल घेऊन स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. तत्पूर्वी डॉ. गोऱ्हे यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांना प्रकृतीची विचारपूस करून धीर दिला, त्यांना न्याय मिळण्याकरीता कायदेशीर मदत करणार असल्याची ग्वाही देखील दिली.

नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पीडित महिलेच्या प्रकृतीची विचारणा केली. तिच्या संपूर्ण उपचारासाठी शासकीय स्तरावर सर्व काळजी घेतली जाईल अशी ग्वाही दिली. या दरम्यान भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक (का.) अनिकेत भारती यांनीही या घटनेचा अधिक गतीने तपास करून योग्य ती कार्यवाही करणार असल्याची माहिती दिली.

या घटनेबाबत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या घटनेच्या सर्व संबंधित आरोपीस लवकरात लवकर जेरबंद करावे, घटनेचा तपास जलदगतीने करावा, घटनेतील आरोपीस मदत करणाऱ्या त्यांच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करण्यात यावी व कडक कलमे लावण्यात यावीत, पीडित महिलेचे समुपदेशन करावे तसेच मनोधैर्य योजनेतून पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोर्जे यांना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दूरध्वनीद्वारे दिल्या.

काय आहे प्रकरण?

पीडित तरुणी गेल्या अनेक महिन्यांपासून बहिणीसोबत माहेरी राहत होती. दोघींमध्ये झालेल्या क्षुल्लक कारणावरून पीडिता रागाच्या भरात घराबाहेर पडली. यानंतर आरोपीने तिला मदतीचे आश्वासन देत भयंकर अत्याचार केले. त्याने तिला भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह जंगलात नेत सामूहिक बलात्कार केले. यामुळे पीडितेला गंभीर इजा झाल्या असून तिचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. आरोपीने गाडी एका ढाब्याजवळील दुचाकी दुरुस्त करणाऱ्या दुकानात नेली. त्यानंतर दुचाकीस्वाराने तिला पुन्हा जंगलात नेले अन् दोघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर निर्वस्त्र अवस्थेत तिला फेकून देत पळ काढला.
दरम्यान, काही जणांनी पीडितेला पाहिल्यानंतर उपचारासाठी मेडिकल कॉलेज, नागपूर येथे दाखल केले. रक्तस्राव थांबत नसल्याने तिच्यावर कोलोस्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आवश्यक नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून कारधा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago