महाराष्ट्र

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 : कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकरीता दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल अशा उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार फक्त दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक २८ डिसेंबर, २०२१ रोजी १७.०० वाजल्यापासून दिनांक ०१ जानेवारी, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत असणार आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करीता दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार वयोमर्यादेची कमाल गणना तत्कालिन शासन नियमानुसार करण्यात आली होती. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर , दिनांक १७ डिसेंबर, २०२१ अन्वये दिनांक ०१ मार्च, २०२० ते दिनांक १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल त्या उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाकडून प्रस्तुत दिनांक १७ डिसेंबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित परीक्षेकरीता दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधील कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल अशा उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार फक्त दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे .अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक २८ डिसेंबर, २०२१ रोजी १७.०० वाजल्यापासून दिनांक ०१ जानेवारी, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत असणार आहे.

ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याकरीता विहित अंतिम दिनांक ०१ जानेवारी, २०२२ रोजी २३:५९ वाजेपर्यंत असणार आहे.

भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणे याकरीता विहित अंतिम दिनांक ०२ जानेवारी, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत आहे. चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ०३ जानेवारी, २०२२ बँकेच्या कार्यालयीन वेळेत भरावे.

विहित पद्धतीने व विहित कालावधीत अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनाच विषयांकित परीक्षेच्या प्रवेशासाठी विचार करण्यात येणार असल्याचेही भरणे यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago