new guidelines on corona
मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा लाभ झाल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, तरीही राज्यातील संचारबंदी तातडीने मागे न घेता निर्बंधांमध्ये हळूहळू शिथिलता आणण्यात येईल. राज्य सरकारकडून सावध पावले टाकण्यात येणार आहेत.
कडक निर्बंधामुळे गेल्या काही दिवसांत दुकाने बंद आहेत. त्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. १५ मेनंतरच्या निर्बंधांना व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. सकाळी ११ ते ५ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याबाबत मागणी होत होती. परंतु, राज्य सरकारने निर्बंध कायम ठेवले होते. मात्र आता १ जूननंतर निर्बंध शिथिल करण्याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जूनपासून संचारबंदी उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असून सरकारकडून टप्प्या-टप्प्याने निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात दुकानदार, व्यापाऱ्यांना प्राधान्य देत दुकाने उघडली जातील. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार आणि मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरू केली जातील. जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.
महाराष्ट्रात बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, अमरावती, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा कोरोनाच्या रेड झोनमध्ये समावेश आहे. त्यामुळे १ जूननंतर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले तरी या जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…