महाराष्ट्र

सोमनाथ गिते यांना व्यसनमुक्ती परीषदेचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा’ पुरस्कार

पुणे : व्यसनमुक्ती परीषदेच्या वतीने देण्यात येणारा २०२२ चा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२० सोमनाथ गिते यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राज्यस्तरीय स्तरावर दिला जात असून पुरस्काराचा वितरण सोहळा २४ फेब्रुवारीला मुंबईतील विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार असल्याची माहिती पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व व्यसनमुक्ती परिषदेच्या अध्यक्षा प्रा. अंजली पाटील यांनी दिली आहे.

सोमनाथ गिते यांनी सामाजिक कार्य म्हणून गेल्या काही वर्षांपासून व्यसनमुक्ती विषयावर समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिकं, सोशल मीडिया आदी माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य करत आहेत. नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खा. सुप्रिया सुळे, आ. मुक्ता टिळक, वर्षा विद्या विलास यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे.

व्यसनमुक्ती परीषद ही राज्यात व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था तसेच सदन व्यक्ती, विषयतज्ञ, व्यसनमुक्ती सेवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, समुपदेशक यांचा गौरव व यांच्या कार्याला गती मिळून व्यसनमुक्ती चळवळ बळकट व्हावी या उद्देशाने हे पुरस्कार दिले जात असल्याची माहिती व्यसनमुक्ती परिषदेचे सचिव प्रा. अजिनाथ शेरकर यांनी पुरस्कार जाहीर झाल्यावर दिली. ही निवड व्यसनमुक्ती परिषदेच्या निवड समितीचे प्रमुख व्यसनमुक्ती तज्ञ डॉ. विजय पवार, डॉ. राजकुमार गवळे, सचिव प्रा. आजिनाथ शेरकर यांच्यासह सात तज्ञ सदस्यांनी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून अंतिम यादीची मुंबईत घोषणा केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago