Wrestler Died Of Heart Attacks During Wrestling Practice
पंढरपूर : तालमीत कुस्तीचा सराव करत असताना २३ वर्षाच्या पैलवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरच्या वाखरी येथील मारूती सुरवसे हा तरुण कोल्हापुरातील एका तालमीत सराव करत होता, त्यावेळी ही घटना घडली. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
गेल्या काही वर्षांपासून सुरवसे हा कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता. दरम्यान, रात्री तालमीत कुस्तीचा सराव करून झाल्यानंतर अंघोळ करत असताना अचानक छातीत दुखू लागल्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मयत मारूतीचे वडील वाखरीत शेती करतात. मारूतीला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. कुस्तीमध्ये करियर करण्यासाठी तो कोल्हापूर येथील तालमीत कुस्तीच्या सरावासाठी राहत होता. दरम्यान, या घटनेमुळे तरुणांमध्ये वाढणारा हृदयविकाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…