सोलापूर

सात वर्षांच्या चिमुकल्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

सोलापूर : सोलापूर-विजापूर रोडवरील सोरेगाव येथे सोमवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. सात वर्षांचा ऋषी लक्ष्मण भरले या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषी शौचासाठी घराशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेला होता. परंतु बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता, ऋषी टाकीजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. तातडीने त्याला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

घटनास्थळापासून ऋषीच्या नातेवाईकांची घरे अगदी जवळच असल्यामुळे सुरुवातीला कुटुंबीयांना वाटले की तो कुठे तरी खेळत असेल. मात्र बराच वेळ झाला तरी तो न आल्याने शोधाशोध करण्यात आली. त्याचा चुलत भाऊ त्याला शोधायला गेला असता, त्याला टाकीजवळ ऋषी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. ही माहिती त्याने तात्काळ कुटुंबीयांना दिली, त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु उपचार सुरू होण्याआधीच ऋषीचा मृत्यू झाला होता.

ऋषीच्या मृत्यूमुळे त्याच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार हरिश्चंद्र केंजळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पंचनामा करून घटनेची नोंद पोलीस स्टेशनच्या नोंदवहीत घेतली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago