Sex Racket Busted in Mumbai, 8 Arrested, 10 Women Rescued
मुंबई : दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड पूर्व परिसरात मलबार हिल पोलिसांनी मोठी कारवाई करत देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, बळजबरीने यात ढकलण्यात आलेल्या दहा महिलांची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साईधाम मंदिराजवळ हे रॅकेट बळजबरीने चालवले जात होते. आरोपी या महिलांना वैयक्तिक फायद्यासाठी देह व्यापारात ढकलत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली. छापेमारीदरम्यान, पोलिसांनी अंदाजे ८२,००० रुपयांची रोख रक्कम आणि २.०४ ग्रॅम ड्रग्ज (किंमत सुमारे १०,००० रुपये) जप्त केली असून ते वाहतूक आणि विक्रीसाठी ठेवण्यात आले होते, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या १४ कथित ग्राहकांनाही कारवाईदरम्यान ताब्यात घेतले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे :
सोनी गणेश शर्मा, रिंजी निमा शेर्पा, कृष्णा बिलात भुईयान, विक्रम रजनी भुईयान, अरुण दामोदर यादव, महेशा एच. शिवन्ना, पप्पू कुमार सरजू यादव आणि अमित कुमार कन्हिया यादव.
या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) आणि अंमली पदार्थ नियंत्रण कायदा (NDPS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…