Interstate gang of burglars arrested in Pune
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील हिरजे वस्तीवर दरोडा टाकून वृद्ध व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी आतापर्यंत ६ गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. याबाबत आज पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. या दरोडा प्रकरणात गुन्हेगारांचे धागे-दोरे मिळत नसल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. आता अखेर पोलिसांना या प्रकरणात मोठे यश मिळाले असून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका खासगी साखर कारखान्याकडे ऊस तोडणी मजूर म्हणून कामावर आलेल्या ७ जणांनी बोरामणी येथे ९ मार्चच्या मध्यरात्री दरोडा टाकला. या दरोड्यात ७५ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम लुटण्यात आली होती. यावेळी बाबुराव हिरजे या जेष्ठ व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलीस महासंचालकांसह सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देत सदर गुन्ह्याचा आढावा घेतला होता. मात्र या गुन्ह्यातील आरोपींविषयी कोणताही सुगावा लागत नव्हता. त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांना ऊस तोडणीनिमित्ताने एक टोळी गावात आल्याची माहिती मिळाली, मग पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. तपास केला असता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा गुन्हा समोर आला.
दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत वैभव उर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा. फकराबाद जि. अहमदनगर), संतोष झोडगे (रा. डोकेवाडी जि. उस्मानाबाद), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी जि. उस्मानाबाद) सुनील उर्फ गुल्या सपा शिंदे (रा. शेळगांव जि. उस्मानाबाद), ज्ञानेश्वर लिंगु काळे (रा. पांढरेवाडी जि. उस्मानाबाद) आणि देवगण सपा शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…