महाराष्ट्र

शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून जादा पैसे घेणाऱ्या खाजगी वाहकांवर कारवाई करणार

मुंबई, दि. 16 : शिमग्याच्या सणासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर कोकणाकडे रवाना होतात, दरम्यान कमी पडत असलेल्या एसटीच्या गाड्यांना पर्यायी एसटी बसगाड्या रत्नागिरीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खाजगी बसवाहकांनी प्रवाश्यांकडून जादा पैसे आकारून लूट करीत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.

कोकणाकडे जाणाऱ्या मुंबईकरांची खाजगी बसवाहक लूट करीत असल्याचे सदस्य भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडले. यावर निवेदन करताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, एसटी बसगाड्या कमी पडत असतील तर इतर एसटीच्या बस गाड्या रत्नागिरीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. खाजगी प्रवासी वाहतूक करणारे बसवाहक प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना देण्यात आले आहेत, असेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

15 तास ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 महिने ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 महिने ago