MLA Gopichand Padalkar's car pelted with stones
सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली आहे. ते बैठकीसाठी सोलापुरात आले होते. सकाळीच त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी आमदार पडळकर हे शहरातील मड्डी वस्ती परिसरातील एसबीआय कॉलनी येथे आपल्या गाडीतून घोंगडी बैठकीला आले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीची काच फोडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठे पोलीस चौकीचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. आता पोलीस कोणी मुद्दाम दगडफेक केली की अन्य कारणामुळे गाडीची काच फुटली याचा तपास करत आहेत.
गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. ते म्हणाले होते की शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…