महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी नगरपालिकेच्या समोर स्वतःला पेटवून घेतले, उपचारादरम्यान मृत्यू

नगरपालिकेतील ठेकेदाराविरुद्ध केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या समोरच स्वतःला पेटवून घेतले. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे.

इचलकरंजी नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भोरे हे सतत तक्रार करत होते. आठ दिवसांपूर्वी एका घंटागाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेत असताना भोरे यांनी नगरपालिकेच्या ठेकेदाराला मृत जनावर ओढत नेण्याऐवजी घंटागाडीत टाकून घेऊन जा, अशी विनंती केली. पण, त्याला नकार देत ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ केली. यानंतर भोरे यांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रार केली. पण, अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही. शनिवारी भोरे यांनी बैठक घेऊन सोमवारपर्यंत याबाबत कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

आज ११ वाजेपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने भोरे यांनी नगरपालिकेच्या समोरच स्वतःला पेटवून घेतले. यामुळे कर्मचारीही भांबावून गेले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत ते पन्नास टक्के पेक्षा अधिक होरपळले होते. त्यांना तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले. पण प्रकृती गंभीर असल्याने सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने इचलकरंजीत खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago