महाराष्ट्र

गोंदियात शिवशाही बस उलटली, भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

गोंदिया : गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ आज दुपारी 1 च्या सुमारास नागपुरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. या अपघातात 7-8 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर अपघाताबाबत स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. त्याचप्रमाणे अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक्सवर पोस्ट करत गोदिंयामधील शिवशाही बस अपघात अतिशय दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्‍यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago