महाराष्ट्र

शिर्डी – आळंदी पालखीला अपघात, कंटेनर भरधाव वेगात पालखीत घुसल्याने चार जणांचा मृत्यू तर नऊ वारकरी जखमी

शिर्डी : शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी ते आळंदी पालखीला संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावरील 19 मैल जवळ अपघात झाला. पालखी आळंदीकडे जात असताना मागून भरधाव वेगाने आलेला कंटेनर थेट पालखीत घुसल्याने हा भयंकर अपघात झाला. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील १९ मैल (खंदरमाळवाडी) परिसरात रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ वारकरी जखमी झाले आहेत. जखमींवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची नावे :

  1. भाऊसाहेब नाथा जपे (कनकुरी)
  2. बाळासाहेब अर्जुन गवळी (मढी बु,ता.कोपरगाव)
  3. बबन पाटीलबा थोरे (द्वारकानगर,शिर्डी)
  4. ताराबाई गंगाधर गमे (कोऱ्हाळे,ता.राहता)

शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज हे दरवर्षी शिर्डी ते आळंदी श्री साईबाबा पालखी सोहळा गेल्या 36 वर्षांना पासून आयोजित करतात. यंदा 37 वे वर्ष आहे. या पालखीत, नाशिक, शिर्डी, अहमदनगर जिल्ह्यात साधरणात 250 ते 300 वारकरी सहभागी झाले होते. ही पालखी गुरुवारी शिर्डीतून आळंदीच्या दिशेने रवाना झाली होती. पालखी संगमनेर तालुक्यातील पुणे- नाशिक महामार्गावरील 19 मैल येथे पोहचली असतांना अचानक भरधाव वेगाने नाशिकच्या दिशेने पुण्याकडे जात असलेला कंटेनर थेट पालखीत घुसल्याने हा अपघात झाला.

कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात :
या अपघाताला कारणीभूत असणारा कंटेनरचा चालक नशेत असल्याने त्याला डुलकी लागल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातातील मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांची ओळख पटली असून कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago