Ajit Pawar
महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेतील कथित घोटाळ्यात नाव असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. त्या अहवालात अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
शिखर बँकेत २५ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीनं आपल्या अहवालात संचालक मंडळावर ठपका ठेवला होता. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन करत कर्जवाटप केल्यानं बँकेला आर्थिक फटका बसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं होतं. अजित पवार, हसन मुश्रीफ, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ यांच्यासह विविध पक्षांतील ६९ बड्या नेत्यांचा या संचालक मंडळात समावेश होता. रिझर्व्ह बँकेनं यात हस्तक्षेप करत हे संचालक मंडळ बरखास्त केलं होतं व चौकशीचे आदेश दिले होते.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण होतं. आता मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने या क्लोजर रिपोर्टला विरोध केला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…