सातारा

महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्पाचा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

सातारा :  सातारा पोलीस दलाच्यावतीने जिल्ह्यात महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचा आढावा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथील शासकीय विश्रामगृहात घेतला. या आढावा बैठकीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, महिला व बाल विकास अधिकारी -विजय तावरे आदी उपस्थित होते.

यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा व महाविद्यालये सुरु झाली आहेत. महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थींपर्यंत पोहचून त्यांना आत्मसंरक्षणाचे धडे द्यावेत. त्याचबरोबर त्यांच्या विषयी असणाऱ्या कायद्यांची माहिती द्यावी.

या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 438 गावांना भेटी दिल्या आहेत. भविष्य काळात आणखीन गावांना भेटीदेण्याबात आराखडा तयार करा. महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात आणखीन प्रभावी राबवा, अशा सूचनाही देसाई यांनी केल्या.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago