महाराष्ट्र

जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? पण… – संजय राऊत यांनी केला ‘हा’ दावा…

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. आमच्याकडे राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? सत्ताही परत मिळवता येईल. पण पक्षाची प्रतिष्ठा ही आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले कि, “एकनाथ शिंदे हे सध्या आमच्यापासून लांब आहेत, ते जवळ आल्यावर आम्ही त्यांच्याशी बोलू. मी काल एकनाथ शिंदे यांच्याशी तासभर फोनवरून चर्चा केली. आमच्यात अत्यंत चांगल्या वातावरणात चर्चा झाली. एकनाथ शिंदे हे माझे फक्त सहकारी नव्हेत तर मित्रही आहेत. आम्ही गेली ३५-४० वर्षे एकत्र काम करतोय. उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांचे असेच नाते आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आमदार प्रथम सूरत आणि आता गुवाहाटीमध्ये गेले आहेत. आमदारांनी पर्यटन करणे ही चांगली गोष्ट आहे. पण ते परत येतील.”

तसेच एकनाथ शिंदे हे स्वगृही परत येतील. एकनाथ शिंदे यांना शिवसेना सोडणं आणि आम्हाला त्यांना सोडणं, या दोन्ही गोष्टी खूप अवघड आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसैनिकच म्हणून संपूर्ण आयुष्य काढतील, असा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago