महाराष्ट्र

रेखा जरे यांच्या हत्या प्रकरण : जिल्हा सत्र न्यायालयाने बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अहमदनगर : रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे बाळ बोठेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आजच्या सुनावणीत अ‍ॅड. महेश तवले यांनी बाळ बोठेच्या बाजूने युक्तिवाद केला. मात्र, सत्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.

बाळ बोठेंचे वकील महेश तवलेंनी या प्रकरणाचा हनी ट्रॅपशी संबंध जोडला. आणि हनी ट्रॅपमुळेच बाळ बोठेला या प्रकरणात गोवण्यात आल्याचं महेश तवले म्हणाले. बाळ बोठे पत्रकार म्हणून काम करतात. त्यांनी वृत्तपत्रात हनीट्रॅपची मालिका चालवली. या वृत्तमालिकेत त्यांनी सागर भिंगारदिवेचं नाव घेतलं. सागर भिंगारदिवे हाच हनीट्रॅपचा मास्टरमाईंड असल्याचा खुलासा त्यांनी केला. त्यामुळेच त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. महेश तवलेंकडून करण्यात आला.

मात्र, हनीट्रॅपमधून जर बाळ बोठेला फसवण्यात आलं असेल तर मग सागर भिंगारदिवे आणि बाळ बोठेमध्ये इतक्या बैठका का झाल्या? हत्याकांडाच्या दिवशी बाळ बोठे सागर भिंगारदिवेशी संपर्कात कसा? आणि त्याच वेळी बाळ बोठेने रेखा जरेंना इतके फोन कशासाठी केले? असे प्रश्न विचारत सरकारी वकील सतीश पाटील यांनी तवलेंचा युक्तिवाद खोडून काढला.

दरम्यान, बाळ बोठे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. विमान प्राधिकरणाला तशा सूचना देण्यात आल्या होत्या.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago