Two young men tragically lost their lives in a severe truck accident on the Mumbai-Goa Highway
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदीजवळ आज सकाळी मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. काल बांधकाम मंत्र्यांकडून रखडलेल्या या महामार्गाच्या कामाची पाहणी देखील करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बावनदी स्टॉपजवळ आज (21 फेब्रुवारी 2025) सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे तरुण जागीच ठार झाले. हा मालवाहतूक ट्रक (MH 08 HD 8292) गोव्यातून मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र, बावनदी पुलाजवळ आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक महामार्गावर एका बाजूच्या खोदून ठेवलेल्या भागात गेला. हा ट्रक लोखंडी वजनदार पाईपने भरलेला असल्याने अपघातानंतर ट्रकमधील सर्व लोखंडी पाईप थेट ट्रकच्या केबिनमधून बाहेर पडले. त्यामुळे केबिनचा चक्काचूर होऊन केबिनमध्ये असलेल्या चालक मोहम्मद अफ्तार समशेर अली (वय 22, रा. नागनाथपूर जिल्हा सुलतानपूर) याच्यासह त्याचा सहकारी महंमद गुलाम रजब अली (वय 21 राहणार इब्राहिमपूर जिल्हा प्रतापगड) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग वाहतूक केंद्रचे हेड कॉन्स्टेबल नाटेकर यांच्यासह इतर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून दोन तरुणांचा मृतदेह रत्नागिरीत पाठविण्यात आला. अपघातप्रकरणी पुढील कार्यवाही ग्रामीण पोलीस करीत आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…