Ratnagiri Nagarparishad Unveils Statues of Indian Luminaries | Maharashtra Suvarn Jayanti
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत कोकण विभागातील भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे, पांडूरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. भीमराव आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर यांच्या अर्धपुतळ्यांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
याप्रसंगी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रविंद्र फाटक आदी उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण प्रांगणात जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांकडून वाहनांच्या सुट्ट्या भागांचा वापर करुन हे पुतळे तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक पुतळा 4 टनाचा आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी 9 महिने परिश्रम घेतले आहेत. प्रत्येक पुतळ्यासमोर त्यांच्या कार्याची माहिती मराठी आणि इंग्रजीमधून देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोनशिलेचा अनावरण करुन आणि कळ दाबून या पुतळ्यांचे लोकार्पण केले. जे जे स्कूल ऑफ ऑर्टचे शिक्षक शशिकांत काकडे, विजय बोंदर, विद्यार्थी विजय पाटील यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…