महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं काल (1 ऑगस्ट) निधन झालं. त्यामुळे टोपे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. खासदार सुप्रिया सुळे रात्रीच टोपे यांची घरी जाऊन दुखात सहभागी झाल्या.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोपे कुटुंबीयांचं सांत्वन करत लिहिलेली भावनिक पोस्ट
सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. या दुःखद प्रसंगी टोपे कुटुंबियांचे सांत्वन करतांना त्यांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. माझे दिवंगत सहकारी व मित्र कर्मयोगी अंकुशराव टोपे यांना शारदाताईंनी आयुष्यभर निष्ठेने साथ दिली. अंकुशराव टोपे यांच्या निधनानंतर त्या कुटुंबाच्या पाठीशी समर्थपणे उभ्या राहिल्या. त्यांचे सुपुत्र आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी महाराष्ट्राची आव्हानात्मक परिस्थिती यशस्वीतेने हाताळताना आपल्या मातोश्रींच्या आरोग्याचीही अखेरपर्यंत योग्य काळजी घेतली. माझे कुटुंबीय व पक्षाच्या वतीने दिवंगत शारदाताई टोपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…